परशुराम घाटात संरक्षण भिंत कोसळली, एकेरी वाहतूक सुरू…

रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली आहे. मध्यरात्री ही घटना घडली. सध्या संरक्षक भिंत कोसळलेल्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. गेली दोन ते तीन वर्ष परशुराम घाट हा पूर्णपणे खोदून येथील घाट रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या महामार्गावर दरड कोसळणे आणि डोंगर खचणे सुरूच आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग कामाच्या दर्जा बाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ML/ML/SL
16 Oct. 2024