सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

 सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका इमारतीत मोरया आयुर्वेद मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरमधून तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. Prostitution under the guise of massage parlors in Sinhagad road area

ML/ML/PGB
15 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *