पिंपरी- चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या ‘स्पा’चा मालक असलेल्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने या कारवाईत बळी पडलेल्या दोन तरुणींची यशस्वी सुटका केली आहे. या प्रकरणी राकेश शिंदे (स्पा व्यवस्थापक), अक्षय बनकर (स्पा मालक) आणि अन्य एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी- चिंचवड मधील निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ब्ल्यू- स्टोन स्पा’ या नावाने स्पा सुरू होता. त्या ठिकाणी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळाली. ‘ब्ल्यू स्टोन स्पा’ मध्ये डमी ग्राहक पाठवून खरंच त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो का? याबाबतची खात्री चव्हाण यांनी करून त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून स्पा मालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे Prostitution in the name of ‘spa’ in Pimpri-Chinchwad.
ML/KA/PGB
31 Dec 2023