राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला मनाई
दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्ति प्रकरणी सुप्रीम कोर्टाची राज्यपालाना मनाई केली आहे. विधानपरिषद सदस्यांच्या राज्यपालांनी नियुक्त करायच्या बारा जागा सध्या रिक्त आहेत , महा विकास आघाडी सरकारने त्या भरण्यासाठी बारा नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना केली होती, मात्र ते सरकार अस्तित्वात असेपर्यंत राज्यपालांनी ही नियुक्ती केली नाही , यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, न्यायालयानेही यावर लवकर निर्णय घेण्याची सूचना देत आपण आदेश देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.Prohibition on the appointment of MLAs appointed by the Governor
राज्यात सत्तांतर होताच राज्यपालांनी माविआ ची शिफारस फेटाळून लावली होती, त्यामुळे आधी नियुक्ती न करता आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या शिफारशी वर राज्यपाल नियुक्त्या करतील म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावर आज सुनावणी झाली It was heard today , तूर्तास अशा नियुक्त्या करण्यास मनाई करत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी सात फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे म्हटले आहे.
ML/KA/PGB
14 Dec .2022