जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

 जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

मुंबई प्रतिनिधी – महिला विकास ट्रस्ट, भारत विकास परिषद शिवकल्याण केंद्र (मालाड शाखा) व गोरगाव सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ व नव नियुक्त महिला नगरसेविकांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

हा कार्यक्रम कमला विहार स्पोर्ट्स क्लब, महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर मा. ऋतु तावडे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. योगेश सागर (आमदार), मा. गोपाल शेट्टी (खासदार), मा. विजय (भाई) गिरकर (माजी मंत्री), मा. बाळा तावडे (जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई भाजप), मा. श्रीराज नायर, मा. एस. एस. गुमाजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मेहंदी प्रशिक्षण प्रकल्पाचे विशेष कौतुक करण्यात आले. अनेक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन महिला विकास ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. क्रांती गिरकर-कुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिनू गुप्ता, रेखा गोयल, जीत मिश्रा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते आणि सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *