आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंदा चषकाचा अनावरण सोहळा

 आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंदा चषकाचा अनावरण सोहळा

ठाणे दि ६– गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुप्रतिक्षीत प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या वर्षीच्या चषकाचे अनावरण करून करण्यात आला. हा सोहळा मीरा-भाईंदर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू आणि प्रो गोविंदा तिसऱ्या पर्वाचे बॅड अॅम्बेसेडर ख्रिस गेल, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्व विक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित होते.

प्रो गोविंदा लीगचे तिसरे पर्व ७.८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील प्रतिष्ठित डोस. एसव्हीपी स्टेडियममध्ये आयोजित केले केले आहे. यावर्षीचे पर्व अधिक भव्य आणि नेत्रदीपक असणार आहे, ज्यात १६ व्यावसायिक संघ, ३२०० हून अधिक गोविंदा आपले कौशल्य, सामर्थ्यांचे प्रदर्शन करतील. गोविंदा सीझन ३ मध्ये एकूण दीड कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी ३ एक लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाणार आहेत.

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू ख्रिस गेल म्हणाले, प्रो गोविंदा लीगचा बँड अॅम्बेसेडर म्हणून जोडले जाणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी जगभरात विविध खेळ पाहिले. पण गोविंदांमधील ऊर्जा, समन्वय आणि सांस्कृतिक अभिमान अतुलनीय आहे. प्रो गोविंदा ही लीग केवळ परंपरेचा उत्सव नाही, तर हा एक अनोखा क्रीडा प्रकार आहे, ज्यामध्ये जागतिक स्तरावर लोकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. यात शारीरिक ताकद, सांधिक कौशल्य आणि परंपरेचा अफलातून मिलाफ पाहायला मिळतो. जो जगाने यापूर्वी कधीही पाहायला नसेल. या प्रवासाचा एक भाग होताना मला खूप आनंद होत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. जिथे भारत आपले सामर्थ्य जगासमोर सादर करेल.

महाराष्ट्र शासनाने याला अधिकृत मान्यता दिली असून, ही लीग सांस्कृतिक वारसा जतन करते आणि त्याच वेळी तरुण गोविंदांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक स्पर्धात्मक आणि आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या खेळातून ताकद, शिस्त आणि सांघिक कौशल्य प्रदर्शित केले जाते.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *