प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी समारोह २१ जानेवारी रोजी मुंबईत

मुंबई दि.१७ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : प्रा. मधु दंडवते यांचा जन्मशताब्दी समारोह समारंभ रविवार 21 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.या समारोहाचे अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी .जी. परिख उपस्थित राहणार आहेत.
प्रा.मधु दंडवते यांच्या समवेत केंद्रीय पातळीवर ज्यांनी काम केले, लोकसभेत वैचारिक भुमिका विशद करताना ज्यांनी त्यांना जवळून पाहिले आहे असे अनेक विविध लोकशाहीवादी पक्षांचे राष्ट्रीय नेते या कार्यक्रमला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जे के एनसीचे अध्यक्ष फारूख अब्दुला, शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे, राजदचे अध्यक्ष लाल्लू प्रसाद यादव , सीपीआय (एम) महासचिव सिताराम येचुरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सीपीआय महासचिव डी. राजा,एम पी आर एस पी आई एम के प्रेम रामचंद्रन, रालोद अध्यक्ष जयंत चौधरी, खासदार दानिश अली, जनता दल युनायटेड चे माजी खासदार के सी त्यागी, आ. जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रा.मधु दंडवते जन्मशताब्दी समारोह समितीचे स्वागताध्यक्ष मा. खास.हुसेन दलवाई यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली.
प्रा. मधु दंडवते यांचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यांनी केलेले काम उदा. लोकशाहीवादी विचारांची भुमिका लोकसभेत, कामगार-शेतकऱ्यांच्या रस्त्यावरील आंदोलनात मांडली आहे. तसेच भौगोलिक डोंगराळ कोकणात रेल्वे साकार केली आहे. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून समतोल निधी वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणीबाणीच्या काळात अठरा महिने तुरूंगवास भोगला आहे .आजच्या परिस्थितीत असे प्रा. दंडवते असते तर त्यांनी ज्या लोकशाही समाजवादी मूल्यांसाठी संघर्ष केला त्यासाठी ते संपूर्ण देशभर लोकांमध्ये झंझावात निर्माण करण्यासाठी सरसावले असते.
हिटलरचे गुणगाण गाणारे धर्मांध फॅसिस्ट देशात सत्तेवर आहेत. त्यांनी संविधानाविषयी ब्र न काढता संविधान मुळातून कसे उध्वस्त करता येईल याचे षडयंत्र सुरू केले आहे. धर्मांध उन्माद एवढा शिगेला नेला आहे की अन्य धर्माच्या लोकांना देशात असुरक्षितता वाटू लागली आहे. विकासाच्या पोकळ प्रसारात जनतेला भ्रमिष्ठ करण्यात येत आहे, अशा पार्श्वभूमीवर प्रा. दंडवते यांनी जे केले असते त्याचे जाग्रण करण्यासाठी आपण त्यांचे शताब्दी वर्ष सांगता समारंभ म्हणून साजरा करीत आहोत, असे दलवाई यांनी सांगितले.
ML/KA/SL
17 Jan. 2024