प्रा. साईबाबा यांना उच्च न्यायालयाकडून क्लिन चिट
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रा. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची नुकतीच मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली. या निकालाला खंडपीठानं स्थगिती द्यावी, असं अपिल राज्य शासनानं केलं होतं. पण हे अपिल देखील हायकोर्टानं फेटाळून लावलं आहे. प्रा. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि दिवंगत पंडू नरोटे या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
प्रा. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि दिवंगत पंडू नरोटे या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला, ज्यांनी साईबाबांच्या अपीलवर सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा पूर्वीचा दोषमुक्तीचा आदेश रद्द केला होता. जी.एन. साईबाबा यांचे वकील हरिष लिंगायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आली आहे.
मे 2014 मध्ये, प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक केली होती. त्यानंतर साईबाबांना दिल्ली विद्यापीठाने निलंबित केले होते. महाराष्ट्राच्या गडचिरोली न्यायालयाने साईबाबांना UAPA च्या कलम 13, 18, 20 आणि 39 अंतर्गत दोषी ठरवले होते. प्राध्यापक साईबाबा अपंग आहेत. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून जुलै 2015 मध्ये जामिनावर सुटका झाली होती. जी.एन. साईबाबा, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, क्रांतिकारी लोकशाही आघाडी नावाच्या संघटनेशी देखील संबंधित होते.
ते ‘क्रांतीवादी लोकशाही आघाडी’चे उपसचिव होते.माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल गुप्तचर संस्थांनी 2014 मध्ये ‘रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट’ला लक्ष्य केले होते. यानंतर हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.
SL/KA/SL
5 March 2024