राज्यात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सिड्सपासून ऊस निर्मिती

कोल्हापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोईम्बतूर येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ऊस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून तयार केलेल्या ऊस रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड (ता. शिरोळ) येथे कृषिभूषण फौडेशन ऊस रोपवाटिकेत या प्रयोग यशस्वी करण्यात आला भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय ऊस विकास विभागाच्या केंद्रीय पथकाने येथे भेट देऊन ऊस रोपांची पहाणी केली. कृषिभूषण फौडेशन ऊस रोपवाटिकेचे प्रमुख एल. डी. कुंभार यांनी ऊस रोपवाटीकेत हा प्रयोग यशस्वी केला आहे. केंद्रीय पथकाचे प्रमुख विरेंद्र सिंग यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे सांगून रोपवाटीकेचे प्रमुख श्री. कुंभार यांच्या कामाचे कौतुक केले.
ऊस उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोगाला बळी पडत असलेले तेच तेच जीर्ण झालेल्या पारंपारिक बियाणे. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदलणे आवश्यक असल्याचे मत श्री. कुंभार यांनी व्यक्त केले. जिल्हा कृषी अधिक्षक अजय कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी जयश्री हावळे, कृषी पर्यवेक्षक कमाल बाण कृषी सहायक सुवर्णा कोळी, सचिन कुंभार, मोहन परीट, बाळू कुंभार, विनायक परीट, राहूल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
SL/ML/SL
10 July 2024