तारापूर एमआयडीसीमधील कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई

 तारापूर एमआयडीसीमधील कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारखान्यातील घातक रासायनिक सांडपाणी आवश्यक प्रक्रिया न करताच थेट नैसर्गिक नाल्यात सोडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर उत्पादन बंदीची कारवाईच्या बडगा उगारला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट इ ३४ मधील आरे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदीची कारवाई कली आहे.

कारखाना उत्पादनादरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आरे ड्रग्स कंपनीला 28 डिसेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. ते पास्थल गावाच्या हद्दीतील नैसर्गिक नाल्यात आणि दांडी खाडीत घातक रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे आढळून आले. 9 जानेवारी 2023 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, कारखाना व्यवस्थापन समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. शिवाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यक असलेली पाच आणि दहा लाखांची बँक हमी रक्कमही जमा केली नाही. 23 नोव्हेंबर रोजी पास्थल नाल्याच्या तपासणीनंतर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आरोपांना पुष्टी दिली. आरेतील औषध कारखान्यातील प्रदूषणासंबंधीच्या सर्व अहवालांचा सखोल आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर उत्पादन बंदीचा आदेश जारी केला आहे. त्यांचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत.

तारापूर एमआयडीसीमधील कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाजाने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत राष्ट्रीय हरीत लवादाने कारखानदार आणि टीईपीएस यांना प्रदूषणाची भरपाई म्हणून सुमारे १६० कोटी रूपयांचा दंड ठोठावला होता. तारापूर एमआयडीसीमधून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणामुळे परिसरातील मानवी जीवन, पर्यावरण, पाण्याचे स्रोत आणि सागरी जलचरांना अपरिमित धोका पोहचत आहे. हरित लवादाच्या दंडात्मक कारवाईनंतरही प्रदूषणाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी औद्योगिक वसाहत परिसरातील प्रदूषणाची गंभीर दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरही प्रदूषण होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.Production ban action on factory in Tarapur MIDC

ML/KA/PGB
10 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *