घराच्या गच्चीवर स्ट्रॉबेरीची झाडे जगवून घेतले उत्पादन

 घराच्या गच्चीवर स्ट्रॉबेरीची झाडे जगवून घेतले उत्पादन

जालना, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्ट्रॉबेरी म्हणजे थंड वातावरणातील पीक, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी या पिकाच्या मागे लागत नाही.आपल्याकडे वातावरणच नाही मग कशाला प्रयोग करायचा म्हणून कुणी स्ट्रॉबेरी लागवडीचा नाद करत नाही.बाजारात येणारे स्ट्रॉबेरी विकत घ्यायचे नी शांत बसायचं.पण जालन्यातील एका तरुणाने मात्र या विचाराला छेद दिला.महाबळेश्वर सारख्या थंड ठिकाणी येणार स्ट्रॉबरीचं पीक जालना शहराच्या औदयोगिक वसाहतीतील घराच्या गच्चीवर घेण्याचा यशस्वी प्रयोग पंचविशीत ल्या तरुणाने यशस्वी करून
दाखवला आहे.

महेश गायकवाड,जालना शहराच्या भर औद्योगिक वसाहतीत राहणारा, कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा जिज्ञासू तरुण.घराच्या आजूबाजूला स्टील कंपन्या असल्याने वातावरणाचा विचार न केलेलाच बरा.पण या पठ्याने इंटरनेटच्या माध्यमातून वातावरणाची माहीती घेत सेंद्रीय पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकासाठी लागणाऱ्या पोषक वातावरणाचा इत्यंभूत अभ्यास केला.Produced by growing strawberry plants on the roof of the house

महाबळेश्वरला जी शेती केली जाते तिथल्या तापमानात व जालन्याच्या तापमानात ७ ते ८ डिग्री सेल्सिअस चा फरक आहे, म्हणजे जालन्याचे तापमान जास्त आहे.पण हलक्या जमिनीत कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाची निवड करून या अवलीयाने आपल्या घरावरील ६०० स्क्वेअर फुटांच्या गच्चीवर ४०० स्ट्रॉबेरीच्या झाडांचा मळा फुलवला.

गेल्या सप्टेंबर महिन्यात महेशनी महाबळेश्वर वरून स्ट्रॉबेरीची ४०० मायक्रो रोपे मागवली.ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची आपल्या घराच्या गच्चीवर प्लास्टिक पिशव्यांमध्ये लागवड केली. यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करून ठिबकच्या साहाय्याने
महेशनी रोपांच्या भोवती ओलसरपणा टिकवून ठेवला.लागवडीच्या ३ आठवड्या नंतर या रोपांना फुले यायला लागली आणि आपल्या मेहनतीला फळं आल्याने महेशचा आत्मविश्वास वाढला.

पुढील ६ आठवड्यांनी म्हणजे ३ महिन्यातच स्ट्रॉबेरीची फळं यायला लागली आणि औद्योगिक वसाहतीत स्ट्रॉबेरी बहरू शकते हा महेशचा प्रयोग यशस्वी झाला.आता महेश च्या घराच्या गच्चीवर रसाळ, मधुर,लाल चुटुक स्ट्रॉबेरी बहरली असून त्याच्या या बागेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातील लोक उत्सुकतेने येऊ लागली आहेत.

कुठल्याही रासायनिक खाते,औषधींचा वापर न करता अभ्यासू व जिज्ञासू पणाने पिकाचे,पाण्याचे व्यवस्थापन करत अगदी कमी जागेत महेशनी हे करून दाखवलं आहे.
आपल्या भागातील वातावरण योग्य नसल्याने शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडी कडे वळत नाहीत पण त्यासाठी कुणी प्रयोगशील वाटेचा मार्ग अवलंबत नाही त्यामुळे चांगली पिके घेण्यापासून आपण दूर राहतो हे महेश गायकवाड या पंचविशीत असलेल्या तरुणाने दाखवून दिलं आहे.

आतापर्यंत २१ हजारांचा खर्च महेशनी केलाय.सध्या महेशच्या गच्चीवर ४०० रोपे बहरली असून, विकत घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तो २५०/- दराने रोप विकतो आहे ,सोबतच त्याची काळजी कशी घ्यावी, पाण्याचे नियोजन कसे करावे,सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याचे मार्गदर्शनही करतो. जालना जिल्ह्यातील लोकांनी आपल्या टेरेस गार्डन मध्ये सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून आलेल्या स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घ्यावा असा महेश चा मानस आहे.

त्याच्या या बागेला भेट देऊन रोप विकत घेत आपली हौस पुरी करण्यासाठी जालनेकरांची पाऊले आता औद्योगिक वसाहती कडे वळू लागली आहेत. MIDC सारख्या भागात फुलवलेली ही बाग शेतकऱ्यांसाठी व घरघुती टेरेस गार्डनचा शेतीसारखा वापर करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

ML/KA/PGB
11Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *