हिंदुस्थान समर्थक पाकिस्तानी नागरिक तारिक फतेह यांचे निधन

 हिंदुस्थान समर्थक पाकिस्तानी नागरिक तारिक फतेह यांचे निधन

टोरंटो, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनाडास्थित पाकिस्तानी वंशाचे ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार तारिक फतेह (७३) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कँन्सरशी लढा देत होते. तारिक फतेह हे दशहतवाद आणि इस्लामाबद्दल परखड मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानाला खडेबोल सुनावले होते आणि भारतातील एनडीए सरकारचं समर्थन सुद्धा केलं होतं.

त्यांची मुलगी नताशा फतेह यांनी “पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनाडा प्रेमी, सत्य वक्ता, न्यायासाठी लढणारा, दलित आणि शोषितांचा आवाज तारिक फतेह आपल्याला सोडून गेले. त्यांनी केलेली क्रांतीही कायम राहणार आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, तारिक फतेह हे पाकिस्तानी वंशाचे जरी असले तरी ते स्वत: ला भारतीय समजत होते. ते नेहमी आपल्या भाषणातून मी भारत मातेचा पूत्र आहे, असं सांगायचे. तारिक फतेह यांचा कुटुंब हे मुंबईत राहणारे होते. 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. तेव्हा त्यांचे कुटुंबीय हे कराची इथं गेलं होतं. तिथे 20 नोव्हेंबर 1949 ला कराचीमध्ये तारिक फतेह यांचा जन्म झाला.

लेखक तारिक फतेह यांनी कराची विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेत आपलं नशीब आजमावून पाहिलं. ते एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीमध्ये ते काम सुद्धा करत होते.

इस्लाम धर्माची चिकित्सा करणारे आधुनिक विचारांचे लेखक म्हणून फतेह यांची ओळख होती. ते पुरोगामी विचारांसाठी आणि पाकिस्तानबाबतच्या टोकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांनी अनेकदा भारतातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचं कौतुक केलं होतं.

तारेक फतेह १९८० च्या दशकात कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. कॅनडामध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन निवेदक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

SL/KA/SL

25 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *