भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडची प्रियंका इंगळे 

 भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडची प्रियंका इंगळे 

बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली प्रियांका इंगळे ही बीड जिल्ह्यातील कळंब अंबा येथील आहे. ती इन्कम टॅक्स असिस्टंट मुंबई येथे कार्यरत आहे. तसेच क्रीडा अधिकारी म्हणून देखील परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली असून दरम्यान खो खो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये ती कर्णधार असणार आहे.

13 जानेवारीपासून पार पडणाऱ्या नॅशनल खो-खो स्पर्धेमध्ये भारतीय खो-खो संघाची स्पर्धाही पाकिस्तान खो-खो संघ बरोबर होणार आहे त्यामुळे या संघाकडून कशा पद्धतीने प्रतिनिधित्व केलं जातं आणि या स्पर्धेतून आपलं पदक कसं जिंकलं जातंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याविषयी प्रियांकाचे वडील हनुमान इंगळे आणि आई यांच्यावर नातेवाईकांसह मित्रमंडळींना कडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

प्रियंका ही वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती खो खो खेळत आहे तिने आतापर्यंत 23 नॅशनल खो खो स्पर्धा जिंकल्या आहेत त्याचबरोबर प्रियंकाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देखील मिळाला आहे, अहिल्या होळकर पुरस्कार देखील मिळाला आहे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे, दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेच्या कर्णधारपदी प्रियंकाची निवड झाली आहे, वडील म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो आणि बीड जिल्ह्यातील खो-खो स्पर्धेतील कर्णधारपदी निवड होणारी पहिलीच मुलगी आहे.

प्रियंकाचा मला खूप अभिमान आहे ती खूप जिद्दी आहे लहानपणापासूनच तिने खो-खो खेळाची तिला आवड होती त्याचबरोबर तिचे करिअर सुद्धा यामध्येच घडवायचे असं तिने निश्चित ठरवलं आणि तिच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं आज ती नॅशनल खो खो स्पर्धेच्या कर्णधार पद्धतीची निवड झाल्यामुळे आज आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो आणि बीड जिल्ह्यातील ही पहिलीच मुलगी आज नॅशनल खो-खो स्पर्धेच्या कर्णधार पदी निवड झाल्यामुळे आम्हाला खूप तिचा अभिमान वाटतो असे तिच्या आई वडिलांचे म्हणणे आहे . विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील या मुलीने केलेल्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून होताना पाहायला मिळत आहे.

ML/ML/SL

12 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *