गुरुपौर्णिमेच्या दिवशीच विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापकाची हत्या

हिसार,दि. १० : आज देशभर गुरुपौर्णिमा साजरी होत असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील हिसार येथील एका शाळेत बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी चाकूनं भोसकून त्यांच्या मुख्याध्यापकाची हत्या केली. हिसार जिल्ह्यातील बास बादशाहपूर गावातील करतार मेमोरियल सीनियर सेकेंडरी स्कूलचे मुख्याध्यापक जगबीर सिंग (वय 50) यांची आज (10 जुलै 2025) हत्या करण्यात आली. त्यांना सकाळी चाकूने चाकूने भोसकण्यात आले. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे कॅम्पसमध्ये घबराहट पसरली.
या प्रकरणात स्थानिक हाँसीचे पोलीस अधिक्षक अमित यशवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना केस कापून येण्यास, व्यवस्थित पोशाख करण्यास आणि शाळेचे नियम पाळण्यास सांगितले होते. सिंग यांनी या मुलांना त्यांच्या वागण्यात सुधारणा करण्याची ताकीद दिली होती. मुख्याध्यापकांच्या या सूचनेमुळे हे विद्यार्थी संतापले होते. त्यांनी एक फोल्डिंग चाकू बाहेर काढला आणि सिंग यांच्यावर अनेकवेळा वार केले. यात ते जागीच कोसळले. त्यानंतर रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे. कॅम्पसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे मुलगे मुख्याध्यापकांना भोसकून पळताना दिसत आहेत.
SL/ML/SL