पंतप्रधानांच्या मातोश्री रुग्णालयात
अहमदाबाद, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यूएन मेहता रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, यूएन मेहता रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येणार असल्याचीही माहिती मिळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे अनेक आमदार रुग्णालयात आहेत.
याच महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत हिराबेन यांनी मतदान केले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला असून याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी पार केली आहे.
28 Dec. 2022