ब्रिटिनच्या राजापेक्षा श्रीमंत झाले पंतप्रधान सुनक

लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. संडे टाइम्सने श्रीमंतांची नवी यादी जाहीर केली. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. या श्रीमंत यादीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी १२२ दशलक्ष पौंड (सुमारे १२८७ कोटी रुपये) वाढ झाली असून नवीन यादीमध्ये, जोडप्याची अंदाजे निव्वळ संपत्ती २०२४ मध्ये ५२९ दशलक्ष पौंडवरून ६५१ दशलक्ष पौंड (६,८६७ कोटी रुपये) झाली आहे. ब्रिटनच्या राजापेक्षाही श्रीमंत पंतप्रधान सुनक संपत्तीमध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सुनक आता ब्रिटनचे राजा चार्ल्स III यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत झाले आहेत. राजा चार्ल्स III गेल्या वर्षी सुनक कुटुंबापेक्षा श्रीमंत होते, पण गेल्या वर्षी राजाच्या संपत्तीत १० दशलक्ष पौड ते ६१० दशलक्ष पौंड एवढी वाढ झाली.
२०२२ मध्ये ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा जास्त होती. त्यावर्षी एलिझाबेथ II च्या संपत्तीचे मूल्य ३७० दशलक्ष पौंड होते. तर ३५ वर्षांच्या इतिहासात संडे टाइम्सच्या वार्षिक संपत्ती यादीत समाविष्ट होणारे सुनक पहिले आघाडीचे राजकारणी आहेत. भारताची प्रख्यात आयटी कंपनी इन्फोसिसमधील अक्षता मूर्ती यांची हिस्सेदारी जोडप्याच्या संपत्तीत वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. इन्फोसिसचे मूल्य ७० अब्ज डॉलर असून अक्षता मूर्ती यांचे वडील नारायण मूर्ती कंपनीचे सह-संस्थापक आहेत, तर कंपनीत अक्षता यांचाही मोठा हिस्सा आहे.
SL/ML/SL
18 May 2024