पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली संपत्ती

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली संपत्ती

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व केंद्रीय मंत्री स्वेच्छेने आपली व कुटूंबाची संपत्ती व कर्जाची माहिती जाहीर करतात. याची सुरूवात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या नव्या घोषणेनुसार त्यांच्या संपत्तीमध्ये एक FD आणि एक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र याचा समावेश आहे. या वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत त्यांच्याकडे एसबीआयच्या गांधीनगर शाखेत एफडी खात्यात २.४७ कोटी रुपये होते. मागील वर्षात एफडी खात्यात ३७ लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधानांनी जाहीर केल्यानुसार त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात १४,५०० रुपयांची वृद्धी झाली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी त्यांच्या एनएससीची किंमत ९.१९ लाख रुपये होती. विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर नाहीए, किंवा म्युच्यूअल फंडमध्ये त्यांची गुंतवणूक नाही.

पंतप्रधान मोदींना यांच्या नावावर कोणतेही वाहन व जमीन नाही. त्यांच्याकडे २०,००० चे बाँड होते. अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे पंतप्रधान मोदींकडे इक्विटी बाजारात कोणतीही जोखीम नाही. बँक बॅलेंसबद्दल बोलयचं तर पंतप्रधान मोदींकडे केवळ ५७४ रुपये आहेत. यावर्षी ३१ मार्च रोजी त्यांच्याकडे ३०,२४० रुपयांची रोकड होती.

पंतप्रधान मोदी कोणतेही वेतन घेत नाही. ते वेतनाची संपूर्ण रक्कम दान करतात. त्यांच्याकडे केवळ एकच बँक खाते असून ते गांधीनगरमधील SBI शाखेत आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हे बँक खाते आहे. prime-minister-narendra-modi-announced-wealth

SL/KA/SL

13 Nov.2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *