हिरोशिमा येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण

 हिरोशिमा येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण

हिरोशिमा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने केलेल्या अणूबाँम्ब हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या जपानमधील हिरोशिमा या शहरात आता जगाला अहिंसेचा मंत्र देणाऱ्या महात्म्याचे प्रतिक उभारण्यात आले आहे. जी-7 शिखर परिषदेसाठी जपान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जपान यांच्यातील मैत्री आणि सद्भावनेचे प्रतीक म्हणून भारत सरकारने हिरोशिमा शहराला महात्मा गांधीजींचा अर्धाकृती पुतळा भेट दिला आहे. मोदी यांच्या हस्ते आज हिरोशिमा येथे महात्मा गांधींजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले.

पद्मभूषण पुरस्कार विजेते राम वनजी सुतार यांनी हा 42 इंच उंच कांस्य पुतळा साकारला आहे. मोटोयासु नदीला लागून असलेल्या, प्रतिष्ठित ए-बॉम्ब डोमच्या जवळ आहे तो बसवला आहे. हजारो लोक – स्थानिक आणि पर्यटक येथे – दररोज भेट देत असतात.

जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार आणि संसद सदस्य नाकातानी जनरल, हिरोशिमा शहराचे महापौर काझुमी मात्सुई, हिरोशिमा सिटी असेंब्लीचे अध्यक्ष तात्सुनोरी मोटानी, हिरोशिमा येथील संसद सदस्य आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी; भारतीय समुदायाचे सदस्य; आणि जपानमधील महात्मा गांधींचे अनुयायी आदी मान्यवर अनावरण सोहळ्याला उपस्थित होते.
SL/KA/SL
20 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *