या दोन देशांमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते UPI सेवेची सुरुवात

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे आर्थिक व्यवहार करण्याला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाल्या नंतर ही सेवा आता भारत सरकार अन्य देशांमध्येही सुरु करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI म्हणजेच ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ सेवा सुरू केली आहे.त्यामुळे आता श्रीलंका आणि मॉरिशसचे लोकही आपापल्या ठिकाणी त्यांचा वापर करू शकतील. त्याच वेळी भारतातील लोक दोन्ही देशांमध्ये यूपीआयद्वारे पेमेंट करू शकतील. UPI सेवा सुरू करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताचा UPI आता भारतासोबतच्या भागीदारांना जोडणे ही एक नवीन जबाबदारी पार पाडत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या कार्यक्रमात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासह तिन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नरही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी याच मॉरिशसमध्ये यूपीआय सेवेसह रुपे कार्ड सेवा देखील सुरू केली आहे. आता मॉरिशस बँका रुपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करू शकतील. याद्वारे दोन्ही देशातील लोक या कार्डद्वारे उपलब्ध सेवांचा वापर त्यांच्या स्वत:च्या देशात तसेच एकमेकांच्या ठिकाणी करू शकतील. दरवर्षी 5,000 हून अधिक भारतीय पर्यटक मॉरिशसमध्ये पोहोचतात. तेथील एकूण लोकसंख्येमध्ये 20,000 भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशात यूपीआय लाँच करण्याची कल्पना भारतात झालेल्या जी 20 शिखर परिषदेदरम्यान मांडण्यात आली होती आणि आता त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. मॉरिशसमध्ये यूपीआय वापरण्यासाठी वापरकर्त्याला यूपीआय ग्लोबल आणि यूपीआय इंटरनॅशनल डाउनलोड करावे लागतील. याद्वारे सुलभ व्यवहार सुविधेचा लाभ घेता येईल.
अलीकडेच फ्रान्समध्येही UPI सेवा सुरू करण्यात आली आहे. आता लोक यूपीआयद्वारे आयफेल टॉवरचे तिकीट काढू शकतील.फ्रान्समधील भारतीय दूतावासाने 2 फेब्रुवारी रोजी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे यूपीआय लाँच केले.
त्याआधी सिंगापूर, युएई, नेपाळ, भूतानमध्ये सक्रिय आहे. यूपीआय सुरू झाल्यानंतर ऑनलाइन व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. . गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये यूपीआयद्वारे 18.23 लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवहार झाला होता. ही आकडा मागील वर्ष 2022 च्या याच कालावधीपेक्षा 54 टक्के अधिक होता.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सेवा 2016 मध्ये लाँच झाली. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने तयार केले आहे. यामध्ये थेट बँक खात्यात सुलभ पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याआधी डिजिटल वॉलेट प्रचलित होते. वॉलेटमध्ये केवायसी सारखा त्रास होतो, तर यूपीआयमध्ये असे काही करावे लागत नाही.भारतातील RTGS आणि NEFT पेमेंट प्रणाली RBI द्वारे चालवली जाते. IMPS, RuPay, UPI यांसारख्या प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ऑपरेट केल्या जातात. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून UPI व्यवहारांसाठी शून्य-शुल्क फ्रेमवर्क अनिवार्य केले होते.
SL/KA/SL
12 Feb. 2024