पंतप्रधान मोदी लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी या निमित्त पुण्यात संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.पुण्यातील एसपी कॉलेज प्रांगणात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला. दरम्यान पंतप्रधानांच्या सुचनेनुसार या पुरस्कारात स्वरूपात मिळलेली रक्कम नमामि गंगेला देण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा स्वरूपात एक सन्मानपत्र एक विशेष ट्रॉफी ज्यामध्ये केसरीचा पहिला अंक, लोकमान्यांची पगडी आणि लोकमान्यांची एक प्रतिमा याचा समावेश आहे देण्यात आली. यासोबतच पुरस्कार स्वरूपात एक लाख रुपयांची रक्कम देखील देण्यात आली. मात्र पुरस्कारात मिळालेली ही रक्कम पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार नमामि गेंगे प्रोजेक्टला देण्यात आली आहे.
देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमिला मी कोटी कोटी वंदन करतो, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरूवात केली. मोदी म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा असून मी जितका उत्साहीत आहे तेवढाच भावूक देखील आहे. आज आपले आदर्श बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. या दोघांना मी श्रद्धापूर्वक नमन करतो असे पंतप्रधान म्हणाले. आज मला पुण्याच्या पावन भूमिवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर येण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान या कार्यक्रमाला शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिपक टिळक, सुशिलकुमार शिंदे आणि टिळक परिवारातील सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
SL/KA/SL
1 Aug 2023