पंतप्रधान आज पुण्यात

पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सिंचननगर हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
तत्पूर्वी लोहगाव विमानतळ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ML/KA/SL
1 Aug 2023