तुळजापुरात ड्रग्जचे रॅकेट विरोधात पुजारी आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

धाराशिव,दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) श्रीक्षेत्र तुळजापुरात मादक पदार्थ तस्करी आणि सेवनाचे मोठे रॅकेट सुरू आहे आणि हजारो तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. या संकटाच्या विरोधात तुळजापूरमधील पुजारी, व्यापारी, आणि ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यांनी या विरोधात ठोस कारवाईची मागणी करीत इशारा दिला की, कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करून तुळजापूर शहर बंद आंदोलन केले जाईल. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना चार महिन्यांपूर्वीच ड्रग्जच्या संकटाची माहिती देण्यात आली. मात्र त्यांनी त्यावर पांघरूण घातल्याचा आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.
आज पालकमंत्री शिंदे गटाचे ठाण्याचे प्रताप सरनाईक तुळजापूरमध्ये आले होते. . त्यांना ड्रग्ज तस्करी आणि रॅकेट चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. निवेदन दिल्यानंतरही कारवाई न केल्यास ग्रामस्थ, पुजारी आणि व्यापाऱ्यांनी रस्ता रोको आणि तुळजापूर बंदचा इशारा दिला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील आता याबाबत आवाज उठवलेला आहे.
शुक्रवारी 14 फेब्रुवारीला रात्री सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडी टोल नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखा आणि तामलवाडी पोलिसांनी एका गाडीतून अडीच लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या गोळ्या आणि दहा लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे.
SL/ML/SL
20 Feb. 2025