जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय बाजारातील तेजीला खीळ निर्देशांकात मोठी घसरण.

 जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय बाजारातील तेजीला खीळ निर्देशांकात मोठी घसरण.

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. बाजारावर जागतिक संकेत,घाऊक महागाईचा दर(WPI),वेगाने पसरणारा डेल्टा व्हायरस(Delta virus),अमेरिकेतील  बॉण्ड बाईंग प्रोग्राम(bond purchases),चीनने काही क्षेत्रात घातलेले निर्बंध या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी.

सेन्सेक्स व निफ्टी तिसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकावर बंद. Sensex, Nifty Close At Record Highs For Third Day.
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात मजबूत झाली. बाजारात बुल्सचा जोश होता.निफ्टी आणि सेन्सेक्सने पुन्हा नवीन विक्रमाची नोंद केली. Reliance, Bajaj Finance, HDFC आणि Tata Steel या दिग्गजांमुळे बाजारात उत्साह संचारला.आय.टी क्षेत्रातही प्रचंड तेजी होती.वरच्या स्तरावर थोडी नफावसुली देखील झाली. दिवसभरात निफ्टीने १६,५८५ व सेन्सेक्सने ५५,६८० चा विक्रमी स्तर गाठला. सलग सहाव्या दिवशी निफ्टी वाढ घेऊन बंद झाला.ऑगस्टमध्ये निफ्टी सोमवारपर्यंत  ७ वेळा विक्रमी उच्चांकावर बंद झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १४५ अंकांनी वधारून ५५,५८३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३४ अंकांनी वधारून १६,५६३ चा बंद दिला. Markets end on positive note supported by metal and oil&gasnames.

सोमवारी वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै मध्ये महागाईत घसरण झाली असून घाऊक महागाईचा दर ११. ६ टक्क्यापर्यंत घसरला. India’s Wholesale Price Inflation Sequentially Eases To 11.16 Per Cent In July

आय.टी व एफएमसीजी क्षेत्रातील समभागांच्या जोरावर बाजारात विक्रमी तेजीचा जोर कायम. Sensex, Nifty Extend Record-Breaking Streak Led By IT, FMCG Shares. 

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली.बाजारात प्रचंड चढउतार होता. कोरोनाचे वाढते रुग्ण व चीनमधील इंटरनेट क्षेत्रावर वाढत असलेला सरकारी दबाव या कारणांमुळे बाजारात दबावाचे वातावरण होते. IT आणि  FMCG क्षेत्रात जोरदार खरेदी झाली.आयटी निर्देशांकात ५ आठवडयातील  मोठी तेजी झाली. निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाला.मेटल.बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात दबाव होता.निफ्टीने प्रथमच १६,६०० च्या वर बंद भाव दिला.बाजार बंद होताना सेन्सेक्स २१० अंकांनी वधारून ५५,७९२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५२अंकांनी वधारून १६,६१४ चा बंद दिला. Sensex, Nifty Close At Record For Fourth Day As Tech Stocks Advance.

बाजारात तेजीला खीळ वीकली एक्सपायरीच्या दिवशी विक्रमी स्तरावर नफावसुली. Markets dropped from record highs as traders booked profit at higher levels ahead of the weekly expiry of index futures and option contracts.

बुधवारी बाजाराची सुरुवात विक्रमी स्तर गाठून झाली.गुरुवारी मोहरम निमित्त बाजाराचे कामकाज बंद असल्याकारणाने वीकली एक्सपायरी ही बुधवारीच होती.सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५६,११८व व १६,७०१ चा नवीन विक्रमी स्तर गाठला ( the Sensex and the Nifty touched record highs levels of 56,118.57 and 16,701.85).बाजाराने सलग पाचव्या दिवशी आपली विक्रमी परंपरा चालूच ठेवली.डेल्टा विषाणूचे वाढते रुग्ण बघता जपान मध्ये प्रतिबंध वाढले. तर न्यूझीलंड मध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करण्यात आली. बाजारात वरच्या स्तरावर नफावसुली झाली व तेजीला खीळ बसली.दिवसभरातील कामकाजात Hindalco Industries, Kotak Mahindra Bank, ICICI Bank, Tata Motors आणि SBI Life Insurance  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व Eicher Motors, UltraTech Cement, Bajaj Finance, Adani Ports  आणि  Bajaj Finserv ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १६२ अंकांनी घसरून  ५५,६२९ या स्तरावर बंद झाला व  ४५ अंकांनी घसरून निफ्टीने १६,५६८ चा बंद दिला.

मेटल क्षेत्रातील घसरणीमुळे सेन्सेक्स व निफ्टीने दोन आठवडयाची तेजीची मालिका तोडलीSensex, Nifty Snap Two-Week Winning Streak As Metal Stocks Weigh.

शुक्रवारी आठवडयाच्या शेवटच्या दिवशी कमजोर ग्लोबल संकेतांच्या पार्श्वभूमीवर.भारतीय बाजाराची सुरुवात कमजोर झाली. मार्केट उघडताच सेन्सेक्समध्ये  जवळपास ६०० अंकांची घसरण झाली. बाजारात प्रचंड चढउतार होता. वेगाने पसरणारा डेल्टा व्हायरस,अमेरिकेत बॉंडबाईंग प्रोग्राम मध्ये गुंतवणूक हळूहळू कमी होण्याची शक्यता व चीनने काही क्षेत्रात घातलेले निर्बंध याचा परिणाम जागतिक बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला.FMCG वगळता सगळ्या क्षेत्रात घसरण झाली खास करून बँकिंग(Banking),फार्मा(Pharma) ,रिअल इस्टेट(Real estate) ,मेटल(Metal) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झाली.मिडकॅप आणि स्मालकॅप समभागात खूप विक्री झाली.  निर्देशांकाने एक आठवडयाचा तळ गाठला.बाजार बंद होताना सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरून  ५५,३३० या स्तरावर बंद झाला व ११८अंकांनी घसरून निफ्टीने १६,४५० चा बंद दिला. Weak signals in global markets have led to a sharp fall in the Indian market

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

JS/KA/PGB
21 Aug 2021

mmc

Related post