प्रीती सुदान यांच्याकडे UPSC ची धुरा, अध्यक्षपदासाठी नियुक्ती
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान गुरुवार एक ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रीती सुदान जुलै २०२० मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाल्या होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये काम केलं आहे.UPSC चे माजी अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर प्रीती सुदान यांची नियुक्ती केली गेली आहे. बेटी बचाव, बेटी पढाओ तसेच आयुष्यमान भारत मिशनसारख्या योजनेत त्यांनी प्रामुख्याची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चिकित्सा आयोग तसेच एलाइड हेल्थ प्रोफेशनल आयोगाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ई-सिगरेट वर प्रतिबंध लावण्याची मागणी केली होती. प्रीती सुदान यांच्याकडे UPSC ची धुरा, अध्यक्षपदासाठी नियुक्ती
TR/ML/PGB
31 July 2024