ठेवणीतले लिंबूपाणी, लिंबू पावडर
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:
एक वाटी तांदूळ पीठ
सात आठ लिंबे
तांदुळाचे पीठ पसरून त्यावर लिंबाचा रस पिळायचा. बिया काढून टाका.
चमच्याने पीठ थोडे हलवून दुसरे तिसरे याप्रमाणे पीठ भिजेपर्यंत लिंबे पिळल्यावर – घरातच पंख्याखाली वाळायला पीठ ठेवायचे.
दोनचार तासांनी लगद्याचा ओलेपणा कमी होत जाईल तसे ढेकळे चुरायची. पावसाळी हवा असल्यास दोनतीन दिवस लागू शकतात. स्टील अथवा प्लास्टिक प्लेट्स घेऊ नका. काचेची / चिनी मातीच्या बऱ्या. ढेकळे खडखडीत वाळतात, काळपटपणा येत नाही.
तळाला तांदूळ पीठ राहील तेसुद्धा पिण्याने नुकसान नाही. एनर्जी ड्रिंक झाले. भेळेत टाकता येते. वरण-भातावर घेता येते. चुरमुरे/भातात पीठ सहज मिसळते. एक वाटी पिठात आठ लिंबांचा रस असतो – बऱ्यापैकी आंबटपणा असतो. दोन महिने सहज टिकेल फ्रिजशिवाय.
Preserved lemonade, lemon powder
PGB/ML/PGB
14 Nov 2024