मुंबई महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिकेचा सन २०२३ – २४ चा ५२,६१९.०७ कोटींचा आणि ६५.३३ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांना आज सादर झाला.
2022 – 23 च्या तुलनेत यात सुमारे 14.52 टक्के इतकी वाढ केली आहे. Presented the balance budget of Mumbai Municipal Corporation
2030 पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधा नियुक्त विकसित अशा आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरिक सुविधा पूर्वीच्या दृष्टीने अर्थसंकल्प सादर केल्याचे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणासाठी खास व्यवस्था
पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अमलात आणली असून वातावरण कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे मुंबई स्वच्छ व शुद्ध हवेसाठी ‘मुंबई वायू प्रदूषण कृती योजना’ आखली आहे.
मुंबई शहराला दक्षिण पूर्व अशा मधून सीडीपी- A चा बहुमान प्राप्त झाला आहे. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी १७२९ कोटीची अंदाजी तरतूद करण्यात आली आहे.
ML/KA/PGB
4 Feb. 2023