मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ लोकांवर विविध प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा वारंवार प्रयत्न केल्याने संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठा संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मोरजकर मराठा विरोधी असल्याचे आरोप लावले होते. शिंदेच्या शिवसेनेने देखील उबाठा शिवसेना मराठा समाजाबाबत दुट्टपी भूमिका बजावत असल्याचा आरोप लावत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. कुर्ल्यातील स्थानिक मराठा समाजाकडून यानंतर प्रविणा मोरजकरांविरोधात मराठा विरोधी असल्याचे बॅनर कुर्ल्यातील मोक्याच्या ठिकाणी झळकवण्यात आले. मराठा समाजाने विरोध दर्शविल्यानंतर आता मोरजकरांनी मराठयांना खुले चॅलेंज दिलं आहे.
“मराठा विरोधकांनी माझ्या विरोधातील पुरावे दाखवा असे म्हणत विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि त्यांना विरोधक घाबरले असल्याचे” वक्तव्य प्रविणा मोरजकर यांनी केलं आहे. मराठा समाजाच्या विरोधात माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांनी केलेल्या वक्तव्याने आता मराठा विरुद्ध मोरजकर या वादाची अजून एक ठिणगी पडली आहे.
मराठ्यांना केलेल्या या खुल्या आव्हानाने शिवसेना उबाठा गटाला आता मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ML/ML/PGB
4 Oct 2024