प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी दाखल
चंद्रपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी मोठी रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली, या रॅलीने काँग्रेसच्या लोकसभेतील प्रचाराचा प्रारंभ झाला, या लोकसभेच्या तिकिटासाठी रस्सीखेच झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मात्र रॅली या सभेला अनुपस्थित होते. चंद्रपूरच्या न्यू इंग्लिश शाळा मैदानावर रॅलीचा समारोप झाला, कालच्या सभेत बोलताना विरोधी उमेदवार मुनगंटीवार यांनी सहानुभूतीच्या अश्रूंवर जाऊ नका असा उल्लेख केला होता त्यावर प्रहार करताना अशी सहानुभूती नकोच मी आमदार म्हणून केलेल्या कामावर मूल्यमापन करा असे उत्तर प्रतिभा धानोरकर यांनी दिले, मुनगंटीवार यांच्या विधानाला जनता माफ करणार नाही असेही त्या म्हणाल्या.
ML/ML/SL
27 March 2024