प्रथमेश-मुग्धा होणार आयुष्यभराचे जोडीदार

 प्रथमेश-मुग्धा होणार आयुष्यभराचे जोडीदार

रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सारेगमप लिटील चॅम्पमधुन पुढे आलेली आणि आज सगळ्या महाराष्ट्राची लाडकी गायक जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. विविध कार्यक्रमांमध्ये ही जोडी स्टेजवर सुरांत सूर मिसळताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली युगुलगीते पाहिल्यावर अनेक चाहत्यांनी प्रथमेश आणि मुग्धा हे आयुष्यभराचे जोडीदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर या दोघांनी काल फेसबुक पोस्ट करत आपल्या नात्याची कबुली दिली आहेत. त्याचबरोबर एक रोमँटीक फोटोही शेअर केला आहे.

ही पोस्ट प्रसिद्ध होतात अवघ्या काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी शुभाशिर्वाद देत या सुरेल जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी मिश्किलपणे ‘ आम्हाला अंदाज होताच, फक्त बातमीची वाट पाहत होतो, आम्हाला पण बोलवा,न चुकता! मला वाटलंच होतं, काहीतरी पाणी मुरतंय? अशा मिस्कील टिपण्णीही केल्या आहेत.

सारेगमप कार्यक्रमात प्रथमेशला मोदक तर मुग्धाला मॉनिटर असे मिस्कीलपणे म्हटले जात आहे. आजही चाहते त्यांना त्याच नावाने ओळखतात. त्यामुळे प्रथमेश आणि मुग्धाने आनंदाची बातमी शेअर करत असताना #MGotModak #ModakGotMonitor हे हॅशटॅगही वापरले आहेत. आता महाराष्ट्राची ही आवडती जोडी लगीन गाठ कधी बांधणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

SL/KA/SL

16 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *