प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज..
बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील महायुतीचे आमदार राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, श्वेता महाले, आकाश फुंडकर हे सहा आमदार यावेळी उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत रॅलीचा समारोप सभेत झाला . या सभेला मंत्री पाटील यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी मार्गदर्शन केलं. देशाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले. या सभेला पक्षाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/KA/PGB 2 APR 2024