माजी खासदार प्रताप सोनवणे यांचे निधन
नाशिक, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते आज दुपारी कॉलेज रोडवरील डिसूझा कॉलनीतील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
1992 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आलेल्या प्रतापदादा सोनवणे यांनी भाजपाचे काम सुरू केले त्यांना नाशिक महापालिकेची उमेदवारी देण्यात आली होती त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून सलग दोन वेळा विजय मिळवला. त्यानंतर त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली त्यातही ते विजयी झाले होते.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती अध्यक्ष आणि चिटणीस अशी पदेही त्यांनी भूषवली होती त्यांचे वडील दिवंगत मन्साराम सोनवणे हे देखील बागलाण मतदार संघाचे आमदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभाताई सोनवणे, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. विशेष म्हणजे आज प्रतापदादा सोनवणे यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांची त्यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
ML/KA/PGB 22 Dec 2023