प्रशांत कोरटकर याला 3 दिवसाची पोलीस कोठडी

 प्रशांत कोरटकर याला 3 दिवसाची पोलीस कोठडी

कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने आज तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

तेलंगणातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोचले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने काल, सोमवारी दुपारी तेलंगणातून अटक केली.

रात्रभर प्रवास करून आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोहोचले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय तंत्रज्ञानात पोलीस बंदोबस्त तैनात केला आला होता.

ML/ML/SL

25 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *