प्रसाद ओकने केली नवीन बायोपिकची घोषणा
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर या चित्रपटात साकारलेल्या आनंद दिघेच्या भूमिकेला रसिकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. आता प्रसाद एका नवीन बायोपिकसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने याबाबत घोषणा केली.
लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हा बायोपिक करणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनावर हा चित्रपट असून ‘तोच मी.. प्रभाकर पणशीकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच अभिजीतचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येऊन गेला. तर या आधीही त्याने अनेक दर्जेदार चित्रपट केले आहे. अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा बायोपिक देखील अभिजीतनेच साकारला होता. त्यानंतर अभिजीतची ही मोठी घोषणा आहे. विशेष म्हणजे प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहायला सारेच उत्सुक आहेत.
चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ असे दोन सिनेमे प्रसादने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. त्याचा ‘धर्मवीर’चा सर्व प्रवास आता ‘माझा आनंद’ या पुस्तकातूनही समोर आला आहे. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. अशा प्रकाशझोतात असतानाच प्रसादचा नवा बायोपिक येत आहे. एक पोस्ट शेयर करत त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.
ML/KA/SL
2 Jan 2023