प्राणीप्रेमींचा मदतीसाठी मुंबईकर सरसावेल
मुंबई, 18: शहरातील प्राणीप्रेमींसाठी बांद्रा येथे मुंबईकर एकवटले आणि अनोख्या प्राणीप्रेमींचे दर्शन घडले. ब्रांदा येथे ‘महजॉंग – पॉज विथ अ पर्पज’ या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शीतल झुबीन आणि तनिका ठक्कर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रमा आयोजित केली होती.
प्राणीप्रेमींच्या मदतीसाठी हा निधी संकलन उपक्रम फर-रिडाज अॅनिमल अॅण्ड रिहॅबिलिटेशन ट्रस्टसाठी समर्पित होता. फरिदा बजाज यांनी स्थापन केलेल्या या ट्रस्टने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबईतील भटक्या कुत्रे-मांजरे यांच्यासाठी अन्नपुरवठा, बचावकार्य, उपचार, पुनर्वसन तसेच नसबंदी यांसारख्या उपक्रमांद्वारे मोलाचे कार्य केले आहे.
मैत्रीपूर्ण महजॉंग खेळ आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या कार्यक्रमातून, छोट्या समुदाय उपक्रमांमधूनही शहरातील मुक्या जीवांसाठी मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो, हा संदेश ठळकपणे अधोरेखित झाला.KK/ML/MS