वन्य प्राण्यांमुळे मका भाजीपाल्यासह सर्व रब्बी पिकांचे नुकसान
बुलडाणा दि ९ :- जिल्ह्यात दिवाळीपासून अवकाळी पाऊस असल्याने रब्बी पिकांचा हंगाम उशिरा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. सध्या येणाऱ्या दिवसात गहू हरभऱ्याचा रब्बी हंगाम सुरुवात होत असल्याने बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्ज वितरणा करिता जिल्हा केंद्रीय बँकेच्या नियोजनानुसार यंदा ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी बँका पतसंस्था आणि सहकारी सोसायटी सक्रिय झाल्या असून रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना बियाणे खते आणि सिंचनासाठी तातडीने निधीची गरज असते त्यामुळे कर्ज वितरणात होणारा प्रत्येक दिवसाचा विलंब शेतकऱ्यांच्या नियोजनावर परिणाम ठरतो आहे .
शासनाने बँकांना ठराविक काळातील कर्ज मिळण्याची वाट न पहाता शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्यासह मका ऊन्हाळी भूईमूग आधी पिके पेरण्याची लगबग सर्वत्र जिल्हाभरात दिसून येत आहे. मात्र पेरणी झाल्यानंतर डोंगराळ भागात असलेल्या शेतांमधील वन्यप्राणी ज्यामध्ये रोही, रानडुक्कर, नीलगाय, तरस हे प्राणी मोठ्या प्रमाणावर मक्का, गहू हरभरा या पिकांचे नुकसान करताना दिसून येत आहेत .
जिल्हा कृषी विभागाने ३ लाख ८७ हजार ३४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे
जे सरासरी ३ लाख २९ हजार ८०३ तर क्षेत्रापेक्षा अधिक आहे. हंगामात हरभरा २ लाख ६०, ००० हजार हेक्टर, गहू ७८ हजार हेक्टर, मका ३२ हजार हेक्टर व ज्वारी १६ हजार हेक्टर क्षेत्रासाठी कृषी विभागाचे नियोजन आहे .
सोयाबीन काढणीनंतर पेरणी पूर्व मशागत मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. जिल्ह्यातील
मोताळा, शेगाव चिखली ,
खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा पिकांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे.
यावर्षी पाऊस मुबलक मोठ्या प्रमाणावर असल्याने विहिरी तसेच इतर जलाशयांमध्येही मोठ्या प्रमाणावर जलसाठा असल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर घेता येत आहेत. मात्र वन्य प्राण्यांपासून गहू, हरभरा पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी खामगाव ,संग्रामपूर,मोताळा सह डोंगराळ भागात लागून असलेल्या शेतीं असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.ML/ML/MS