प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण
स्वीकारले

मुंबई दि. १७ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या “भारत जोडो न्याय” यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले आहे. ॲड. आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारले का ? तर नाही मात्र, त्यांनी सशर्त हे निमंत्रण स्वीकारले आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.
ॲड. आंबेडकरांनी राहुल गांधींना याबाबत पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणे कठीण जाईल यावर भर दिला आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीला अद्याप ‘इंडिया’ आघाडी आणि महाविकास आघाडीचा भाग नाहीये.
त्यामुळे इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये सामील न होता यात्रेत सामील झाल्यामुळे माध्यमांतून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पूर्ण झालेली नाही. हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही अडचणीचे ठरू शकते. म्हणून, प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना विनंती केली आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी आमंत्रण पाठवावे.
SW/KA/SL
17 Jan. 2024