एससी एसटी क्रिमीलेयर, उपवर्गीकरणावर पुनर्विचार याचिका दाखल करणार

 एससी एसटी क्रिमीलेयर, उपवर्गीकरणावर पुनर्विचार याचिका दाखल करणार

अकोला, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांच्या अनुसूचित जाती (SC)मध्ये क्रिमी लेयर आणि उप-वर्गीकरणाला परवानगी देणाऱ्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रतीक बोंबार्डे यांच्यामार्फत आज पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, यावेळी पुनर्विचार याचिकेतील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.मी हे प्रकरण न्यायालयात हाताळण्यास वकिलांना मदत करीन.

अनुसूचित जाती (SC)मध्ये क्रिमी लेयर आणि उप-वर्गीकरणाला देशभरातील एससी एसटी समाज विरोध करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर 21 ऑगस्ट रोजी विविध दलित – आदिवासी संघटनांनी भारत बंद ची घोषणा केली होती. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा भारत बंद ला पाठिंबा दिला होता.

PGB/ML/PGB
30 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *