प्रज्ञानंद ठरला भारताचा सर्वोच्च रेटिंग असलेला बुद्धीबळपटू

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदनने चमकदार कामगिरी केली आणि डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग लिरेन हा सध्याचा विश्वविजेता आहे. चौथ्या फेरीत त्याला प्रज्ञानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले असून तो नंबर वन भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता. या सामन्यात काळ्या सोंगट्यांसह खेळताना प्रज्ञानंदने ६२ चालींमध्ये विजय मिळवला. क्लासिकल बुद्धिबळ इव्हेंटमध्ये विश्वविजेत्या खेळाडूला पराभूत करणारा प्रज्ञानंदने हा आनंदनंतरचा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
या विजयासह प्रग्नानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद FIDE च्या लाइव्ह रँकिंगमध्ये ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे २७४८.३ गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद १२ व्या क्रमांकावर आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. आनंदचे २७४८.० गुण आहेत. या यादीत मॅग्नस कार्लसन अव्वल स्थानावर आहे. फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रग्नानंद यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०१६ मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या १० वर्षे १० महिन्यांचा असताना प्रग्नानंदने याने ही कामगिरी केली होती.२०१७ मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. यानंतर २०१८ मध्येही त्याने असेच यश संपादन केले.
SL/KA/SL
17 Jan. 2024