प्रफुल्ल पटेल, तटकरे पक्षातून निलंबित

 प्रफुल्ल पटेल, तटकरे पक्षातून निलंबित

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटणीस सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. खुद्द शरद पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

या दोघांची नियुक्ती आपण केली होती त्यामुळे त्यांनी स्वतःहून आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर आज पक्षाच्या शिस्तपालन समितीने बैठक घेऊन शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असा ठराव मंजूर केला आहे. त्यासोबतच कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ट्विट करीत पटेल आणि तटकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती, त्यानंतर शरद पवार यांनी लगेच या दोघांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा ट्विट करीत जाहीर केली आहे.

ML/KA/SL

3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *