प्रभादेवी येथील पादचारी पूल लगेच सुरू करा, शिवसेनेने दिला इशारा

मुंबई, दि २१
प्रभादेवीचा वाहन वाहतुकीचा पूल नुकताच तोडून झाला. परंतु नागरिकांनी पूर्व पश्चिम जाण्यासाठी जो पादचारी पूल उपलब्ध आहे तो रेल्वेने अजूनही सुरू केला नसून तो दसरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आत सुरू करावा असा सज्जड इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. प्रभादेवी येथील पादचारी पुलाची पाहणी करण्यासाटी नुकताच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आमदार अजय चौधरी आणि इतर मान्यवर मंडळीनी प्रभादेवी येथे पाहणी दौरा केला. परंतु हा पादचारी पूल अजूनही सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे l.
खरं तर पुलाची मागणी गेली दहा बारा वर्षे मी सातत्याने करत होतो. त्या मागणीस अखेर मंजुरी मिळाली परंतु पुलाचे काम ज्या वेगाने व्हायला हवे होते त्या वेगाने झाले नाही. दरम्यान मुंबईच्या कोस्टल रोडचे काम वेगाने करण्यासाठी प्रभादेवीचा वाहन वाहतुकीचा पूल तोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नागरिकांना पूर्व किवा पश्चिम जावयाचे असेल तर लोअर परेल किंवा दादरवरून जावे लागते आहे.
या साठी प्रभादेवी स्टेशनसमोर पादचारी पूल तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. पाहणी दरम्यान मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जे उर्वरित काम धांबलेले आहे ते पूर्ण करून नवरात्रीपूर्वी हा पूल पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले. त्या वेळी पुलाची उंची पाहून लगेच एस्कलेटरची गरज लक्षात घेऊन तीही लवकरात लवकर बसविण्यात यावा अशी मागणी देखील केली. त्याला पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत
यांनी दिली. यावेळी एमएमआरसीएल, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.KK/ML/MS