एमआयडीसीतील वीज पुरवठा खंडित, उद्योगांना कोट्यावधीचा फटका

चंद्रपूर दि २४ :– चंद्रपूरात ताडाळी एमआयडीसी परिसरातील २०० केव्ही वाहिनीतून जादा वीज मिळविण्यासाठी एका कंपनीने जेसीबी मशीनद्वारे खोदकाम केले. या खोदकामात महावितरणच्या ३३ केव्ही केबलचे प्रचंड नुकसान केले. यामुळे वीजपुरवठा बंद होऊन एमआयडीसीतील उद्योग ठप्प झाले. उद्योगांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. महावितरणलाही २२ लाखांचा फटका बसल्याने कंपनीला नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एमआयडीसीमध्ये ३०० पेक्षा अधिक उद्योग कंपन्या आहेत. यामध्ये सर्वाधिक सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची संख्या मोठी आहे. मोठ्या नुकसानीचा फटका बसलेल्या उद्योगांनी कोणत्याही परिस्थितीत उत्पादन बंद पडू नये, यासाठी खबरदारी घेतली. त्यामुळे रोजगारालाही चालना मिळाली.
ताडाळी परिसरातील औमेट वेस्ट लिमिटेड (सिद्धबली स्टील कंपनी) या कंपनीने २२० केव्ही वाहिनीतून जादा वीज मिळविण्यासाठी अतिरिक्त केबल टाकण्याकरिता जेसीबीद्वारे नाला खोदण्याचे काम सुरू केले. त्यातच हा प्रकार घडला.