जयंत नारळीकरांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, दि. २७ : जगप्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर २०२५ चे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षी एकूण २३ शास्त्रज्ञ आणि एका संघाला सन्मानित केले जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हे देशातील सर्वोच्च पुरस्कार आहेत. प नारळीकर यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) आणि साहित्य अकादमी पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले.
नारळीकर यांनी त्यांचे गुरू फ्रेड हॉयल यांच्यासोबत मिळून गुरुत्वाकर्षणाचा हॉयल-नारळीकर सिद्धांत मांडला. हा सिद्धांत आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताला पर्यायी मॉडेल होता, ज्याचा उद्देश माकचा सिद्धांत समाविष्ट करणे होता.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निमंत्रणावरून, नारळीकर १९८८ मध्ये पुण्यात इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची स्थापना केली. २००३ पर्यंत त्यांनी त्याचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहिले. देशभरातील विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्र आणि अॅस्ट्रोफिजिक्सला प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे ध्येय होते.
SL/ML/SL