माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, महाराष्ट्रातील ११ मान्यवरांना पद्मश्री
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यवरांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मोहर जोशी या मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर पंकज उधास आणि शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी महाराष्ट्रातील ११ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली, नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर गोव्यातील १०० वर्षीय स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तीसंग्रामात दिलेल्या योगदानासाठी सरदेसाई यांचा भारत सरकारच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी
1) श्री मनोहर जोशी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार महाराष्ट्र
2) श्री पंकज उधास (मरणोत्तर) कला महाराष्ट्र
3) श्री शेखर कपूर कला महाराष्ट्र
महाराष्ट्रीतील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
1) श्री अच्युत रामचंद्र पालव – कला
2) श्रीमती. अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र
3) श्री अशोक लक्ष्मण सराफ – कला
4) श्रीमती. अश्विनी भिडे देशपांडे -कला
5) श्री चैत्राम देवचंद पवार – समाजकार्य
६) श्रीमती. जसपिंदर नरुला – कला
7) श्री मारुती भुजंगराव चितमपल्ली – साहित्य आणि शिक्षण
8) श्री रणेंद्र भानू मजुमदार – कला
9) श्री सुभाष खेतुलाल शर्मा – महाराष्ट्र
10) श्री वासुदेव कामथ – कला
11) श्री विलास डांगरे – आरोग्य
विशेष उल्लेखनीय
कुवेतच्या अल सबाह यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कुवेतचा पहिला परवाना प्राप्त योगा स्टुडिओ सुरू केला. ब्राझीलच्या मॅकेनिकल इंजिनिअर जोनास मासेटी यांना पद्मश्री पुरस्कारने गौरवण्यात आले आहे. मासेटी यांनी भारतीय अध्यात्म आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे.वादक पी. दचनामूर्ति यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले काही मान्यवर
हरिमन शर्मा, जुम्दे योमगम गॅमलिन, जॉयनाचरण बथारी, नरेन गुरुंग, विलास डांगरे, सैखा एझ अल सबा, निर्मला देवी, भीम सिंग भावेश, राधा बहन भट्ट, सुरेश सोनी, पंडी राम मानवी, जोनास मासेट्टी, जगदीश जोशिला, हरविंदर सिंग, भेरू सिंह चौहान, वेंकप्पा अंबाजी सुगतकर, पी दच्चनामूर्ती, निरजा भाटला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा, सॅली होळकर, गोकुळ चंद्र दास, चैत्राम पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
SL/ML/SL
25 Jan. 2025