संपूर्ण महाराष्ट्रात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ चे पोस्टर्स लावणार !
मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पार्टीने मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ आंदोलन सुरु केले आहे.येत्या काही दिवसात मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी आम आदमी पार्टी ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ चे पोस्टर्स लावणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा- मेनन यांनी मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या पत्रकार परिषदेला प्रीती शर्मा मेनन यांच्या सोबत, आम आदमी पार्टी महाराष्ट्र चे उपाध्यक्ष धनराज वंजारी, मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस ,द्विजेंद्र तिवारी, महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे, मुंबई उपाध्यक्ष पायस व्हर्गीस उपस्थित होते.
आम आदमी पार्टी कडून मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मुंबई व महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक ठिकाणी ‘आम आदमी पार्टी’ कडून मोदी हटाव देश बचाओ चे पोस्टर्स लावले जाणार आहे.
पत्रकार परिषदेनंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ चे पोस्टर्स लावले. ते नंतर पोलिसांनी काढले.
ब्रिटिश काळातील कायदे जनतेवर पुन्हा एकदा लादून मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, जर आता आपण या जुलूमशाहीच्या विरोधात उभे नाही राहिलो, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे त्या म्हणाल्या.
SW/KA/SL
31 March 2023