गूढ ग्रंथावर आधारित चित्रपटाचे पोस्टर रिलिज

 गूढ ग्रंथावर आधारित चित्रपटाचे पोस्टर रिलिज

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘निळावंती’ हा प्राचिन ग्रंथ एक गूढ ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. या ग्रंथाशी निगडीत अनेक अंधश्रद्धाही प्रसिद्ध आहेत. या ग्रंथावर आधारित चित्रपच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, ” लवकरच निळावंती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे.

‘निळावंती’ या चित्रपटाचे पोस्टर पाहून हा थरारक चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय… या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे.

SL/KA/SL

24 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *