आर्थिक वर्षाचा सकारात्मक शेवट, पण पुढील आठवड्यात जागतिक घटक ठरवतील दिशा

 आर्थिक वर्षाचा सकारात्मक शेवट, पण पुढील आठवड्यात जागतिक घटक ठरवतील दिशा

जितेश सावंत

२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजाराने सकारात्मक कामगिरी केली आणि सात-दशांश टक्के वाढ नोंदवली. एप्रिलच्या धोरण बैठकीत आरबीआयकडून व्याजदर कपात होण्याची आशा असलेल्या एफआयआयने पुन्हा एकदा खरेदीचा जोर वाढवला आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये तेजी आल्याने बाजाराला चालना मिळाली, परंतु २ एप्रिल रोजी ट्रम्प प्रशासनाकडून होणाऱ्या संभाव्य टॅरिफ घोषणांपूर्वी सावधगिरी बाळगल्याने वाढ मर्यादित राहिली.

In the final week of FY 2024-25, the Indian stock market posted a 0.7% gain, driven by FII buying amid hopes of an RBI rate cut. However, gains were limited due to caution ahead of potential U.S. tariff announcements on April 2.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारतीय शेअर बाजाराचा प्रवास मोठ्या चढउताराने झाला ,सुरुवातीच्या काळात सप्टेंबर २०२४ पर्यंत निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला, त्यानंतर उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांची एक्सिट, अपेक्षेपेक्षा कमी कॉर्पोरेट कमाई आणि अलिकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांबद्दलच्या चिंता यामुळे मंदीला चालना मिळाली.

बाजारात अशांतता असूनही, सेन्सेक्स आणि निफ्टी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले आणि सलग दुसऱ्या वर्षी सकारात्मक परतावा दिला . निफ्टी बँक १० टक्क्यांनी वाढून सर्वोत्तम कामगिरी करणारा फ्रंटलाइन निर्देशांक म्हणून उदयास आला, तर मिडकॅप निर्देशांक ७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ५ टक्क्यांहून अधिक वाढला.

Despite volatility, Sensex and Nifty closed FY 2025 with over 5% gains, with Nifty Bank surging 10%. U.S. markets fell sharply on inflation and trade war concerns, impacting global sentiment.

शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार घसरण झाली त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटताना दिसतील. अमेरिकन बाजार चलनवाढीच्या चिंता आणि व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे घसरला.
U.S-Stocks lose ground amid inflation concerns, trade war worrie.

भारतीय बाजारात सोमवारी ३१ मार्च रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) मुळे बंद राहील.The market will remain shut on Monday, March 31 on account of Id-Ul-Fitr (Ramzan Id)
The Indian market will remain closed on March 31 for Eid. Key events next week include U.S. tariff announcements, March quarter earnings, the RBI policy meeting, U.S. jobs data, crude oil prices, and auto sales figures

येणाऱ्या आठवड्यात बाजाराचे लक्ष २ एप्रिल रोजी होणाऱ्या टेरिफ घोषणा (tariff announcements),मार्च तिमाहीच्या उत्पन्नावर (March quarter earnings),दुसऱ्या आठवड्यात नियोजित आरबीआय धोरण बैठकीवर (RBI policy meeting scheduled in the second week of April),अमेरिकेतील रोजगार डेटा (US jobs data),manufacturing & services PMI numbers,रुपयाची चाल,अमेरिकन डॉलरची कामगिरी (movement of the US dollar)आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती (international crude oil prices. आणि मासिक ऑटो विक्री (monthly auto sales.) यावर असेल.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at23519.30
KeySupportLevels:23451,23424,23402,23382,23350,23195,23163,23092,22992,22979,22929,22865,22798,22744,22,681,22650,22642,22560, and22552 Breaking these could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels: 23543, 23591, 23600, 23631, 23701, 23736, 23751, 23800, 23850, and 23869. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.

The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *