पूजा खेडकर यांची निवड रद्द

 पूजा खेडकर यांची निवड रद्द

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

पूजा खेडकर यांची पुण्याला सहायक जिल्हाधिकारी म्हणून रवानगी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. तिने तिच्या खाजगी कारवर सायरन सारखे भत्ते मिळवले आहेत, जे ऑन-प्रोबेशन कर्मचाऱ्यांना उपलब्ध नाही अशी बातमी पसरल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला

युपीएससीने उपलब्ध नोंदी काळपूजा खेडकर यांची निवड रद्दर्वक तपासल्या आहेत आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल तिला दोषी आढळले आहे. पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती युपीएससीने अधिकृतरित्या दिली आहे. पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमी लेयर) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

पूजा खेडकर यांची निवड रद्द

PGB/ML/PGB
31 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *