प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद

 प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक ॲक्शन घेतली असून, ज्या प्लांटमुळे प्रदूषण होतेय आणि नियमांचे उल्लंघन होत आहे, असे सांत प्लांट बंद करण्याचा आदेश ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिले आहेत. पुण्यात देखील त्याविषयी सर्व्हेक्षण सुरू असून, इथेही कारवाई केली जाणार आहे.

सध्या, या प्लांटमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे MPCB कडे नागरिकांकडून असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 1 मार्चपासून सर्वेक्षण केले जात आहे. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही अशा ठिकाणी अधिकारी तातडीने नोटिसा बजावत आहेत. आंधळे यांनी स्पष्ट केले की जर काही अटींचे पालन केले नाही तर सुधारणेसाठी निर्दिष्ट कालावधीसह नोटीस दिली जाते. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे, मारुंजी, नांदे येथील प्लांट बंद करण्यात आले असून, नांदे गावातील एका प्लांटलाही क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय मारुंजी येथील सहा प्लांटचे काम आधीच थांबवण्यात आले आहे. सध्या, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खराब झाली असून, 100 हून अधिक हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक नोंदवले जात आहेत. या ऱ्हासात रेडी मिक्स प्लांटचा मोठा वाटा आहे.

Polluting ready mix concrete plant closed

PGB/ML/PGB
19 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *