झीनत’ वाघिणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय ताण
भुवनेश्वर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये सध्या झीनत या वाघिणीवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या आठवड्यात झारखंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालपासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर एक वाघीण आढळली होती. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वाघीणीला भटकी वाघीण म्हटले होते. तसेच या वाघीणीला पकडण्यासाठी ओडिशा सरकारने सहकार्य केले नसल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले होते. यानंतर, “३०० किमीचा प्रवास केलेली झीनत ही भटकी वाघिणी अजिबात नाही”, असे म्हणत ओडिशा सरकारने टीकेला उत्तर दिले होते.
या वाघीणीच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बंगालच्या पाच जिल्ह्यांमध्ये झीनतने (वाघीण) दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. लोक घराबाहेर पडू शकत नव्हते, शाळा बंद कराव्या लागल्या. आता ते म्हणतात, वाघीण परत द्या. जर तुमच्याकडे जागा नसेल तर आम्हाला कळवा, आम्ही वाघीण कायमची आमच्याकडे ठेवू.”
या प्रकरणावर ओडिशाचे वन आणि पर्यावरण मंत्री गणेश राम सिंहखुंटियाम्हणाले की, “ममता बॅनर्जी अपरिपक्व आहेत. ओडिशामध्ये भाजपा सत्तेत असल्याने त्यांचा राग राजकीय असल्याचे आहे. ओडिशात पुरेसे जंगल नाही, हे विधान त्यांचे अज्ञान दर्शवते. कारण आमच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३९ टक्के भागात जंगल आहे.” “प्राण्यांना भौगोलिक सीमा माहित आहेत का? आपण भौगोलिक सीमांनुसार प्राण्यांना कसे बंदिस्त करू शकतो? बंगालमधील हत्ती ओडिशात येत असतात त्याचा आम्ही कधी मुद्दा बनवला आहे का? वन्य प्राणी त्यांना हवे तिथे जाण्यास मोकळे आहेत”, असेही सिंहखुंटिया म्हणाले.
SL/ML/SL
9 Jan. 2025