जालन्यातही राजकीय राडा, मंत्र्यासमोर घोषणाबाजी

 जालन्यातही राजकीय राडा, मंत्र्यासमोर घोषणाबाजी

जालना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी आधीच राडा झाल्याची घटना जालन्यात घडली आहे . शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताच शाब्दिक चकमक उडाली होती. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ही घटना घडली.

जालन्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे या बैठकीला आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांना शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याआधी अडवून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हा नियोजन समितीतून कामे मंजूर होत नाही.आम्हाला डावललं जात असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आणि पंडित भुतेकर यांनी केला.

भाजप केवळ शिवसेनेमुळे सत्तेत आहे अशी घोषणाबाजी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.दरम्यान गोंधळ घालणाऱ्या या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ML/KA/SL

7 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *